बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात कर्मवीर डॉ. जगदाळे (मामा) यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी..

बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात कर्मवीर डॉ. जगदाळे (मामा) यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी..

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ): छत्रपती शिवाजी महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेवून बार्शी सारख्या ग्रामीण भागात आपल्या काही निवडक सहकाऱ्यांना सोबत घेवून कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती निर्माण केली,मामांच्या असीम त्यागामुळेच शैक्षणिक क्षेत्रात बार्शीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सोनेरी अक्षराने कोरले गेलेले आहे,असे विचार वृक्षमित्र सुनिल फल्ले यांनी व्यक्त केले. 

येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये बार्शी तालुक्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणारे थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांत ठोकळ हे होते.यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष मा.धैर्यशील देशमुख समाजसेवक मा.सुहास सुतार,मा.चंद्रकांत वडेकर,मा.सतीश पाचकुडवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रथमता प्रमुख मान्यवरांचे हस्ते कर्मवीर मामासाहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.पुढे बोलताना फल्ले म्हणाले, कर्मवीर मामासाहेब यांनी बहुजन समाजातील मुलांची शैक्षणिक हालत पाहिली,ही अवस्था बदलण्यासाठी त्यांनी आपल्या नगरपालिकेतील नोकरीचा त्याग केला,शिवाजी बोर्डीगची स्थापना केली, त्यातूनच पुढे अनेक शाखा चालू केल्या,कर्मवीर मामांच्या त्यागामुळेच एका छोट्याशा रोपट्याचे पुढे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.

यावेळी प्रमुख मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास छंदोप्रेमी उदय पोतदार,प्रेम अग्रवाल,राहुल लोंढे,केतन चवरे यांचेसह सभासद व वाचक उपस्थित होते.ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.