रात्रीस खेळ चाले ......., तरटगाव (कासे. ) येथे अवैद्य वाळू उपसा कारणावरून एकावर कुऱ्हाड- कोयत्याने प्राणघातक हल्ला.... ◼️ झटापटीत एकाची प्रकृती चिंताजनक ◼️ भाऊकीच एकमेकांच्या जीवावर उठली आणि जोरदार रक्तरंजित घटना घडली यामुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण ◼️ अवैद्य वाळू व्यवसायिकास पोलिसांचे अभय असल्याचा जखमीच्या नातेवाईकाचा गंभीर आरोप ◼️ मोकाट फिरणाऱ्या कोयता गॅंग आरोपीवर कडक कारवाईची पालकमंत्र्याकडे करणार मागणी

रात्रीस खेळ चाले ......., तरटगाव  (कासे. ) येथे अवैद्य वाळू उपसा कारणावरून एकावर कुऱ्हाड- कोयत्याने  प्राणघातक हल्ला....    ◼️ झटापटीत एकाची प्रकृती चिंताजनक  ◼️ भाऊकीच  एकमेकांच्या जीवावर उठली आणि जोरदार रक्तरंजित घटना घडली यामुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण  ◼️ अवैद्य वाळू व्यवसायिकास पोलिसांचे अभय असल्याचा जखमीच्या नातेवाईकाचा गंभीर आरोप  ◼️  मोकाट फिरणाऱ्या कोयता गॅंग आरोपीवर   कडक कारवाईची पालकमंत्र्याकडे करणार मागणी

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै. पंढरी दैनिक नगरी न्युज)“ अवैध वाळूचा पैसा लई झालाय,,त्यामुळं तुम्ही माझ काम करत नाही”अस म्हणताच भावकी जिवावर उठली अन घरातले कोयते-कुर्‍हाडी बाहेर काढून रक्ताच्या नात्याच रक्त सांडण्याचा प्रयत्न केलाय, कुर्‍हाडीचे घाव घालत चुलत्यानेच दोन पुतण्यावर कुर्‍हाडीचे घाव घालत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला . ही घटना आहे. पंढरपूर तालुक्यातील माण नदी काठावरील वसलेल्या सिद्धेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असलेल्या छोट्याशा सतत मोल मजुरी करीत कित्येक वर्षानुवर्ष शांततामय असलेल्या या गावात अवैद्य वाळू उपसा तस्करीमुळे हे गाव सतत अशा अनेक अवैध व्यवसायामुळे भाऊबंदकित वाद होऊन धूमसत आहे. तरटगांव (कासे. )येथील पंढरपूर- मंगळवेढा रस्त्या वरील एकलासपूर पासून चार किलोमीटर आंतर असणारे पूर्वेस तरटगांव हे माण नदीकाठी वसले आहे. माण नदीच्या पत्रातून दररोज अवैद्य वाळू उपसा मोठ्या प्रमाणात व्यवसायिकाकडून केला जात असतो या अवैद्य वाळू व्यवसायांना पोलीस प्रशासनाचे कारभारी लक्ष्मीदर्शन घेऊन अवैध्य वाळू उपसा व्यवसाय करणाऱ्यांना गेले कित्येक दिवस मलिदा लाटण्यासाठी पाठबळ देत असल्याची चर्चा गावकऱ्यामधून दबक्या आवाजात होत आहे. वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पडत असून रात्र दिवस वाळू उपशामुळे माण नदीच्या पात्रात मोठ- मोठे खड्डे पडलेले आहेत राजरोसपणे चालणाऱ्या या गोष्टीकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दि .15 जून रविवार रोजी सायं. 7 वाजनेच्या सुमारास गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या छोट्याशा गावात भावकीतच एक रक्तरंजित हाणामारीचा थरार घडलाय,शिवाजी गडदे यांच्या शेतातील पाण्याच्या मोटरीचा बिघाड झाला होता, त्यासाठी त्यांनी ही मोटर दुरुस्त करण्यासाठी प्रशांत गायकवाड यांच्याकडे मोटर दुरुस्त करण्यासाठी मागे लागले होते,मात्र प्रशांत गायकवड हा मोटर दुरुस्त करून देत नव्हता,,त्यासाठी रविवारी त्याची भेट झाली असता शिवाजी गडदे यांनी त्याला अडवून विचारले की, तुला अवैध वाळूचा पैसा लई झाल्याने तू गरिबाच्या विहिरीतील इलेक्ट्रिकल मोटारी दुरुस्त करत नाही,या शब्दाचा राग त्याची भावकी असणारी अन अवैध वाळू उपसा करणारे हरीदास गडदे आणि यशवंत गडदे दोघे भाऊ चर्चा करून आल्यानंतर 

त्यांनी लगेच भांडण सुरू केले .गावातील काही लोकांनी भांडण मिटवले पण सायंकाळी अचानक संशयित वाळू तस्कर हरीदास गडदे आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोकांनी शिवाजी गडदे यांच्या जबरदस्तीने घरात जावून कोयते आणि कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला चढविला,यामध्ये महेश गडदे सुमित गडदे हे सखे चुलत भाऊ असून सुमित गडदे यास सांगली येथील खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले असून परिस्थिती सुमित गडदे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हे गंभीर जखमी झाले असून यातील सुमित गडदेच्या हातावर कुर्‍हाडीचा घाव खोलवर बसल्याने त्याच्या हातचे हाड मोडून रक्ताच्या नसा मोठ्या प्रमाणात तुटल्या असल्याचे सांगितले, आरोपी हरी गडदे व इतर हातात कुराडी - कोयते घेऊन गावातून दारूच्या नशेत फिरून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात होते मात्र या घटनेनंतर तालुका पोलिसानी वाळू व्यवसायिक हरी गडदे या संशयित आरोपीवर उशिरा गुन्हा नोंदवून घेतला असल्याचे जखमीच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आले तसेच अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही त्यास एकच कारण असून ते लक्ष्मी दर्शन घेऊन अवैध वाळू उपसा करणार्‍या आरोपींना पोलिस स्टेशन पाठीशी घालत असल्याचे बोलले जाते. तरी अवैध्य वाळू उपसा व्यवसायकरणारे हरी गडदे व यशवंत गडदे यांनी आमच्यावर पोलिसांमध्ये तक्रार केल्यास तुम्हास जिवंत ठेवणार नाही मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले आरोपीपासून आमच्या कुटुंबांच्या जिवितास धोका असून आम्हास पोलीस संरक्षण देऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांच्याकडून केली जात आहे. 

कोयता गँगचे लोन आता खेडोपाडी