विठ्ठल चा सभासदांना आजपासून ऊस बिलाचे वाटप

(विठ्ठल चा सभासदांना आजपासून ऊस बिलाचे वाटप) सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण 
पंढरपूर( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील शेतकरी यांचा आर्थिक राजवाडा समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकलेली ऊस बिले आज पासून सभासद शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे गाळप केलेल्या तालुक्यातील सभासदांच्या ऊस बिलाचे मोठ्या प्रमाणात देणे प्रलंबित होती तत्कालीन संचालक मंडळ व चेअरमन यांनी सभासदांची थकलेली देणे देण्यास ठरले होते. मात्र डी. व्ही पी . उद्योग समूहाचे तरुण उद्योजक श्री अभिजीत आबा पाटील यांनी कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांची थकीत असणारी रक्कम उसाची मोळी टाकण्याच्या अगोदर देण्यात येतील असे पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात निवडणुकीच्या वेळी एका कार्यक्रमात सांगितले होते ते आज प्रत्यक्ष दिलेला शब्द शब्द पाळला असल्याने तालुक्यातील वाहन मालक ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण चेहऱ्यावर दिसून येत आहे यावेळी कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,