राजकीय इच्छाशक्ती अभावी मराठीला अभिजात दर्जा देण्यास विलंब - डॉ. राजशेखर शिंदे:
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : भारतात सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मराठी भाषा अभिजात दर्जासाठी केंद्र सरकारला अपेक्षित असलेले सर्व निकष पूर्ण करत असूनही जनमताच्या रेट्याअभावी, राजकीय पक्षांच्या एकोप्या अभावी तो मिळत नाही अशी खंत प्रा. डॉ राजशेखर शिंदे यांनी व्यक्त केली. ते श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'अभिजात मराठी भाषा’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. यावेळी मंचावर दत्ता गायकवाड, माजी आमदार नरसिंग मेंगजी, मोहन सोहनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीकांत कामतकर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. नभा काकडे यांनी केले.