शेतकऱ्यांच्या सोयीसाठी करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरू करण्याची आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, ◼️ विधानपरिषद सभागृहात मागणी
------------------------------------------------------------------------------------
मुंबई (दै.पंढरी नगरी न्यूज ) केळीच्या विविध जाती लागवडीचे तंत्रज्ञान रोग व किडनीचे व्यवस्थापन, शिक्षण व प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणि उपयोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे त्यासाठी करमाळा तालुक्यातील शेळगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करावी अशी लक्ष वेधिद्वारे मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषद केली.
निर्यातीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा वाटा सर्वात मोठा आहे राज्यातून होणाऱ्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे 66.43 टक्के आहे .राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आमदार मोहिते- पाटील म्हणाले की, केळी उत्पादनात केळी निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे.
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांनी केंद्रीय मंत्री पियुष विरोधी यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करून घेतला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून 12 लाख 43 हजार 899 मेट्रिक टन केळीची निर्यात होऊन या मागील सुमारे आठ लाख 26 हजार 322 मे टन केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे राज्यातून होणाऱ्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे 66.43% होता त्यासाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुलभता येण्यासाठी केळी संशोधन केंद्र करमाळ्यात सुरू करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.