उदनवाडीतील महात्मा फुले सार्व. वाचनालयात 'महाराष्ट्र दिन' उत्साहात साजरा.

उदनवाडीतील महात्मा फुले सार्व. वाचनालयात 'महाराष्ट्र दिन' उत्साहात साजरा.

---------------------------------------------------------------------------------

सांगोला (पंढरी नगरी न्यूज)  सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात १ मे 'महाराष्ट्र दिन' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ८ वाजता माजी मुख्या. बाळासाहेब वलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन  केले गेले. यावेळी शाहू फुले, आंबेडकर आश्रमशाळेचे शिक्षक प्रभु शेळके सरांनी १ मे या दिवसाचे महत्व काय हे उपस्थित लोकांना सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन वाचनालयाचे नियमित वाचक कवी शामराव गाडे यांनी 'जय महाराष्ट्र देशा' ही सुश्राव्य कविता सादर केली.

या कार्यक्रमासाठी माजी मुख्या.बापुसो गावडे, माजी मुख्या. आण्णासो बंडगर, माजी मुख्या. बाळासो वलेकर, कवी शामराव गाडे, पांडुरंग बंडगर, हरीबा रूपनर, शिवाजी वलेकर, नामदेव सरगर, शाहु, फुले, आंबेडकर आश्रमशाळेचे मुख्या. फिरोज शेख, प्रभु शळके सर, दत्तात्रय सुतार, यशवंत चव्हाण यासह  मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व ग्रामस्थ व वाचकांचे स्वागत व आभार संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वलेकर यांनी मानले.