संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ व दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये अनुदान मिळणार ◼️ मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे राज्य श्रावणबाळ माता -पिता सेवा सामाजिक संघटनेकडून निर्णयाचे जोरदार स्वागत ◼️ शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वाढीव अनुदान जाहीर करण्याची मागणी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै. पंढरी नगरी न्यूज ) राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांना दीड हजार मानधन अनुदान वरून अडीच हजार रुपये मानधन अनुदान वाढीव करण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळ बैठकीमध्ये घेण्यात आल्यामुळे राज्यातील संजय गांधी निर्धार योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .डिसेंबर २०२४ पासून या योजनांचे अनुदान डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
संजय गांधी निराधार प्रणित ,सोलापूर श्रावणबाळ सेवा योजना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव
◼️ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी अनुदान विना प्रलंबित
दारिद्र रेषेखालील एखाद्या कुटुंबातील करता पुरुष मयत झाल्यानंतर शासनाकडून वीस हजार रुपयांचे अनुदान मयताच्या पत्नी मुले यांना वारसांना दिले जाते. या योजनेतून लाभ घेण्यासाठी सध्या राज्यातील सर्व तहसील कार्यालय संजय गांधी शाखेकडे तालुक्यातील या योजनेतून पाच लाभार्थ्यांनी अर्ज सादर केली आहेत परंतु शासनाकडे संजय गांधी योजनेच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अनुदान नसल्याने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज धूळ खात पडले असून ते अनुदान विना प्रलंबित असल्याची माहिती संबंधित संजय गांधी शाखेकडून देण्यात आली.
◼️ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी संजय गांधी निराधार प्रणित श्रावणबाळ सेवा योजना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केली आहे.