सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन.... सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देणारा कामगारांचा कैवारी हरपला :- सुशीलकुमार शिंदे - माजी केंद्रीय गृहमंत्री

सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन....  सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देणारा कामगारांचा कैवारी हरपला :- सुशीलकुमार शिंदे - माजी केंद्रीय गृहमंत्री

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर ( दै. पंढरी नगरी न्यूज ) सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे सोलापुरात निधन झाल्याने कामगार, कष्टकरी गोरगरीब नागरिक मध्ये हळहळ व्यक्त होत आहे मृत्यू समयी 90 वर्षाचे होते. ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते खासदार म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले.

सोलापूर औद्योगिक बँक आणि नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना बँकिंग प्रवाहात आणणारे आणि सोलापूर व यशवंत सहकारी सूत मिलच्या माध्यमातून कापड उद्योगाला चालना देणारे श्री. मार्कंडेय रुग्णालय व अश्विनी सहकारी रुग्णालय यांच्या माध्यमातून गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मिळवून देणारे, जुना विडी घरकुल प्रकल्प, औद्योगिक वसाहत, एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले. पूर्व भागातील विणकर व कामगार वर्गाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आयुष्य वेचणारे एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार पर्यंत प्रवास थक्क करणारे आहे.

माझे जिवलग सहकारी होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक , औद्योगिक व सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सामाजिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधनाची बातमी समजताच अत्यंत दुःख झाले असून काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपला असल्याचे भावनिक मत भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दै. पंढरी नगरी न्यूज च्या प्रतिनिधीशी आपल्या भावना व्यक्त केल्या.