पंढरपूरात विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे होळी उत्साहाने साजरी; भाविक भक्तांची प्रमुख उपस्थिती

पंढरपूरात विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे होळी उत्साहाने साजरी; भाविक भक्तांची प्रमुख उपस्थिती

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे होळी मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरे समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांनी होलिका आणि डफाचे पूजन करून होळी पेटवण्यात आली. 

यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ व अन्य कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते.