पंढरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचीच नियुक्ती कायम प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणार :- गटविकास अधिकारी ,अमोल जाधव यांची माहिती.
-----------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):-
सोलापूर जिल्हा परिषदेतील विभागात आपल्या कामाची मोहोर उठवणारे व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांची प्रशासनाने पंढरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील प्रकल्प विभागाचे संचालक अमोल जाधव हे गेले दोन वर्षा पासून काम पाहत होते. पंढरपूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे यांची अन्यत्र बदली झाल्याने अमोल जाधव यांच्याकडे पंढरपूर पंचायत समितीचा बीडिओ पदाचा पदभार देण्यात आला होता.
प्रभारी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात उल्लेखनीय काम केले तसेच आषाढी वारी कालावधीत पालखी मार्गावरील तसेच पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी स्वच्छताग्रह, प्रशासनातील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आषाढी कालावधीतील यात्रा सोहळ्याचे यंदा उत्कृष्ट नियोजन केले होते.
अतिरिक्त पदावर काम करत असताना पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन उल्लेखनीय काम केले प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी म्हणजेच पंढरपूरच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती केली.
अमोल जाधव यांच्या नियोजनाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत असून पंचायत समिती मधील कर्मचारी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनातील कामाच्या अनुभवाचा माध्यमातून विकासाकरता मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. पंढरपूर पंचायत समितीचे नवीन गट विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्येबद्दल ग्रामसेवक अधिकारी संघटना ,कर्मचारी संघटना व ग्रामीण भागातील नागरिकांतून स्वागत होत आहे.