गौतमी पाटीलचे सोशल मिडिया असिस्टंटला तुंगतच्या युवकाने सुनावले खडे बोल

गौतमी पाटीलचे सोशल मिडिया असिस्टंटला तुंगतच्या युवकाने सुनावले खडे बोल

---------------------------------------------------------------------------------

तुंगत; प्रतिनिधी  (विकास सरवळे): "सबसे कातील  गौतमी पाटील, यांनी राज्यातील युवा वर्गास आपल्या आदाकारीने घायाळ केले असुन भरकटलेला युवक आणि शेतकरी यांचे परिवर्तन करण्याचे दृष्टीने तुंगत येथील युवक शेतकरी कुमार गायकवाड याने नुकतेच एक व्हीडीओ बनवुन तो शेअर केला हा व्हीडीओ पाहिल्यानंतर गौतमी पाटील यांचे सोशल मिडिया पाहणारे असिस्टंटने गायकवाड यांना फोन करून गौतमी पाटील संदर्भात आपण चुकिची माहिती प्रसारित का करता म्हणुन विचरणा केली त्या कथित संभाषणाची आॅडियो क्लीप व्हायरल झाली असुन यामध्ये गायकवाड यांनी संबंधीत असिस्टंटला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

महाराष्ट्राचा शेतकरी या यूट्यूब चैनल वरती या युवकाची क्लिप वायरल झाली आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे समाजाने बघितलं पाहिजे.जे नेते मंडळी गौतमीला लाखो रूपये सुपारी देतात त्यांनी व युवा नेत्यांनी नक्कीच समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करावे गौतमीने पण नक्कीच एवढी सुपारी घ्यावी पण समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करावे समाजिक कार्य करून आदर्श घालुन द्यावा आणि युवा शेतकऱ्यांना तुम्ही शेतीकडे वळा.जास्त या गोष्टींमध्ये वाहवत जाऊ नका असा संदेश कुमार गायकवाड यांनी व्हीडीओच्या माध्यमातुन दिला आहे सदर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित गौतमी पाटील यांचे सहाय्यकांचा पारा चढला आणि गायकवाड यांना फोन करून आम्ही गौतमी यांनी केलेल्या चुका सुधारल्या आहेत ती किती रूपये घेते याचेशी तुम्हाला काय करायचे आहे. ती सादर करीत असणार्या कलेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोण बदला त्यास अश्लिलतेच्या नजरेने पाहु नका असे म्हटले त्यास गायकवाड यांनीही प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले आहेत मी गौतमी पाटील यांचेसंदर्भात काही अक्षेपार्य बोललो नाही राज्यातील तमाम युवा शेतकर्यांनी आपला वेळ शेतीसाठी देऊन नवनविन प्रयोग राबवावेत आणि पाटील यांनी समाजोपयोगी कार्यास थोडी मदत केल्यास बरे होईल महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम अनाथाश्रम भरपूर आहेत अशी बरीच कुटुंब आहेत एक वेळचा अन्न खायचं कठीण आहे तिथे जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी होते का ते या नेते मंडळींनी किंवा गौतमीने बघावे आणि काहीतरी कार्य करावे असे गायकवाड यांनी गौतमीच्या सहाय्यकास  सुनावले.