वैराग पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार १० हजाराची लाच घेताना अटकेत. ◾लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

वैराग पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार १० हजाराची लाच घेताना अटकेत.  ◾लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.


------------------------------------------------------------------------
मोहोळ (दै.पंढरी नगरी न्यूज):-
आपल्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात तपासकामी मदत करतो असे सांगून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेष कृष्णदेव पवार (पो.ह.क्र. २१८०, नेम - वैराग पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरच्या पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी सोलापूर ग्रामीणमधील वैराग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४२२/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 ३९ वर्षीय शेतकरी असलेल्या तक्रारदाराने दि. २८/०९/२०२६ रोजी ला.प्र.वि. सोलापूर कार्यालयास संपर्क केला होता. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये तपासकामी मदत करतो असे बोलून वैराग पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार संदेष पवार यांनी १,००,०००/- रु. ची मागणी केली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर २०,०००/- रु. ची मागणी केली. परंतु तक्रारदाराने केलेल्या तडजोडीवरून शेवटी १०,०००/- रु. लाच मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली. पोलीस हवालदार संदेष पवार यांची दि. २८/०९/२०२६ रोजी वैराग पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे १३.४८ ते १५.३९ या कालावधीमध्ये पडताळणी करण्यात आली असून त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सुरुवातीस २०,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रु. लाच मागणी केली आहे.आरोपीवर दि. २८/०९/२०२६ व दि. ०९/१०/२०२६ रोजी वैराग पोलीस स्टेशन येथे सापळा रचण्यात आला परंतु त्यांना तक्रारदार व पंचाबाबत संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही.
त्यानंतर दि. २८/१०/२०२६ रोजी १४.०० वा. ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ही कारवाई  प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोहेकॉ/५५१ सलीम मुल्ला, पोहेकॉ/३० संतोष नरोटे, पोहेकॉ/१६१६ स्वामीराव जाधव, पोकॉ/९६६ गजानन किणगी, पोकॉ/८६२ राजू पवार, चालक पोकॉ/२०२६ अक्षय श्रीराम यांचा समावेश होता.
या कारवाईस  शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र आणि अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.