स्वातंत्र्यदिनी पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न. ◾प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- भारताचा 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पंचायत समिती सभापती शुभम आगवणे, सहा पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड, वैभव बुचके, डि.एस.आसवले तसेच स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जलसंधारण सप्ताहाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारणाची तसेच पॉश कायदा याबाबतची उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली.
तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी सचिन इथापे, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्याहस्ते आणीबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
