भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट.

भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट.


---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) भारताचा 80 वा स्वातंत्र दिनानिमित्त आज (शनिवार) श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

तसेच श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. 

श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे यांच्या कडून सेवाभावी तत्त्वावर मोफत सजावट करण्यात आली असून, त्यासाठी विविध प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. यात गुलाब, ऑर्केट, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा, ब्लूडीजी इत्यादी फुलांचा समावेश आहे.

याशिवाय, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भक्त निवास येथे तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.