तपकिरी शेटफळ येथील ग्रामसेवक के. एच नवले यांना निलंबीत करण्याची पंढरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीची मागणी . कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा..!
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) ; पंढरपूर मौजे तपकिरी शेटफळ ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक के एच नवले हे मनमानी कारभार करीत असून ते गावातील सर्वसामान्य नागरिकांना अरेरावेची भाषा वापरत असून कोणास जुमानत नाहीत कामावर सतत गैरहजर असतात त्यांच्या या अनागोंदी कारभारास येथील नागरिक वैतागले असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी पंढरपूर वंचित युवा बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन तुपलोंढे यांनी पंढरपूरचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अर्वाच्य भाषा वापरली. तुम्हाला काही काम धंदा आहे की नाही? तुम्ही कार्यालयात येवू नका मी तुमचे निवेदन स्विकारणार नाही, निवेदन देण्याचा प्रयत्न केला तर निवेदन फाडून टाकेन अशी भाषा वापरली. सदरची भाषा ही उर्मटपणाची आहे. सदर ग्रामसेवक हे गावी कधीतरी येतात. ते महिना, पंधरा दिवसातून गावी येतात. त्यांना गावातील लोकांच्या अडीअडचणीचे काहीही देणे घेणे नाही. तसेच कार्यालयीन कर्मचारी बाबू सरगर हे गावातील जनतेला उर्मटपणाची वागणूक देतात. कार्यालयीन कर्मचारी बाबू सरगर हे स्वतः ला लिपीक म्हणवून घेत असून ते ग्रामसेवक यांच्या अनुपस्थितीत कार्यालयीन दप्तराची हाताळणी करतात. त्यांची नेमणूक कोणत्या पदावर आहे याची चौकशी व्हावी.
पक्षाचे निवेदन घेण्यास ग्रामसेवक तयार नाहीत उलट अर्वाच्य भाषा वापरातात. जर पक्षाच्या पदाधिकारी यांना अशी वागणूक देत असतील तर सामान्य लोकांच काय ? निवेदन फाडून टाकेन अशी भाषा वापरणा-या मुजोर ग्रामसेवकास पदावरुन तात्काळ निलंबीत करावे.
सदर के. एच. नवले ग्रामसेवकावर कामात कसूर केल्याबद्दल व पदाचा गैरवापर करुन दमदाटी केल्याबद्दल त्यांची खातेनिहाय चौकशी करुन तात्काळ निलंबन करण्यात यावे. तसेच लोकांच्या कामात अडसर निर्माण करणा-या बाबू सरगर यांना कामावरुन कमी करुन लोकांना होणारा त्रास कमी करावा व दोन्ही व्यक्तिवर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई दि. ०१/०६/२०२३ पर्यंत न केल्यास दि. ०२/०६/२०२३ रोजी पंचायत समिती, पंढरपूर समोर आंदोलन करण्यात येईल, याची दखल घेण्यात यावी ही विनंती.