श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) : - पंढरपूर येथे श्रावण शुक्रवार पर्वानिमित्त श्री. विठ्ठल व रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेस आकर्षक, पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे रुक्मिणी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवा मनी पदक, जवेच्या माळा,लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.