आश्विनी भापकर याची काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड... जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावणार
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज )
पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष आश्विनी भापकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे सामाजिक कार्य पाहून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
आश्विनी भापकर या पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या गावापासून समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पंढरपूर तालुका आणि इतर भागात समाजसेविका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
आश्विनी भापकर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. याचा काँग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्की फायदा होणार आहे.
मंगळवारी सोलापूर येथे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी आ. प्रणितीताई शिंदे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शाहीनताई शेख, सुरेश हसापुरे,चेतन नरोटे, पंढरपूरचे महेश अधटराव, देविदास गायकवाड, तालुक्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने यांच्या प्रमुख उपस्थितीत भापकर यांना पत्र देण्यात आले आहे. भापकर यांची जिल्हा उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक स्तरातून व जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी पदाधिकारी व नेते मंडळींनी त्यांना फोन करून व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अश्विनी भापकर म्हणाल्या की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिताताई शिंदे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे काम करत असताना ध्येयधोरणे सर्वसामान्य महिला व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असून पदाचा उपयोग काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.