तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात पंडीत नेहरू जयंती साजरी..
-------------------------------------------------------------------------
तळसंगी: ता. मंगळवेढा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय वाचनालयात आज सकाळी आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान मा पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.
सूत्रसंचालन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी केले . प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव श्री सुभाष सुर्यवंशी यांनी करताना म्हणाले की आज आपण सर्वजण या छोट्याशा सांस्कृतिक कार्यक्रमांस उपस्थित होते .सर्वांच्या सहकार्याने भारत देशाचे स्वातंत्र्योत्तर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नेहमी प्रमाणे साजरी करित आहोत. पंडीत नेहरू आणि त्यांना लहान मुले फार आवडायचे म्हणून आज बालदिन म्हणून साजरा केला जातो. या नंतर दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितामधून भारत माता की जय, पंडीत नेहरू की घोषणा दिल्या.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की ,आज आपल्या वाचनालयात देशाचे स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलें पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची धुरा समर्थपणे सांभाळली.नेहरुजीना लहान मुले खूप आवडायची, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आज बालदिन म्हणून साजरा केला जातो.ते नेहमी म्हणायचे की लहान मुले ही गुलाबाची फुले आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महादराया पाटील म्हणाले की सर्वजण मिळून या वाचनालयात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.पंडीत नेहरु फार हुशार आणि मुत्सद्दी होते. आपल्या देशाला इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडीत नेहरूनी देशाचा कारभार हाती घेऊन देशाची पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. नेहरूजींना सर्वजण चाचा म्हणत असे सांगितले .यानंतर वाचनालयाच्या वतीने सर्व लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले आभार नवनाथ पाटील यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमांस दिगंबर पांढरे,महादराया पाटील,तम्मा कानडे, रावसाहेब कानडे, नारायण वगरे, नंदू कारंडे, प्रभाकर गायकवाड, रविराज गायकवाड,धुरळा पांढरे,गोरख टकले, मल्हारी म्हारणूर, सोन्या खांडेकर, भिमराव लवटे, अंगणवाडी सेविका सारीका कोळी,ललीता माने इ. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.