स्व .महादेव (अण्णा )आवताडे प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती निमित्त व्याख्यान व महिला मेळाव्याचे मंगळवेढा येथे आयोजन - अंजलीताई आवताडे

स्व .महादेव (अण्णा )आवताडे प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती निमित्त व्याख्यान व महिला मेळाव्याचे मंगळवेढा येथे आयोजन - अंजलीताई आवताडे

-------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्युज) : मंगळवेढा येथील स्व.महादेवराव अण्णा आवताडे प्रतिष्ठान यांच्यावतीने स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजलीताई समाधान अवताडे यांनी दिली. हा कार्यक्रम आज बुधवार दिनांक ११/१/२०२३ रोजी न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा कै. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रांगणात पुणे येथील  यशदाचे  सं. साधन व्यक्ती व प्रसिद्ध व्याख्याते प्रा .गणेश शिंदे यांचे मा जिजाऊ माँ .साहेब, या विषयावर यांचे व्याख्यान होणार असून महिलांसाठी महिला मेळावा होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे अंजलीताई अवताडे प्रियदर्शनी पवन कदम - महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. तरी कार्यक्रमास मंगळवेढा शहर तालुक्यातील महिला व नागरिकांनी सहकुटुंब परिवार व्याख्यान प्रेमींनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजीका नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजलीताई आवताडे व प्रियदर्शनी पवन कदम - महाडिक यांनी केले आहे.