शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

---------------------------------------------------------------------------------

बार्शी(  दै.पंढरी नगरी न्यूज ) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रासेयो,सांस्कृतिक विभाग, पृथ्वी कुल यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व  स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. राहुल पालके उपस्थित होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आकाश माळी व राजकन्या प्रक्षाळे यांनी मनोगत व्यक्त केले.आयक्यूएसी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राहुल पालके यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार  राष्ट्र विकासासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या महान कार्यकर्तृत्वाची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरणादायी आहेत असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा गरड यांनी केले. पूजा खाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थितांचे आभार पूनम पंडित यांनी मानले. ऋतुजा गरड व सोनाली आगलावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सांस्कृतिक प्रमुख डॉ एस डी भिलेगावकर, बी पी एड विभाग प्रमुख डॉ ए जी कांबळे, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.