आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त भालेवाडी पशुवैद्यकीय शिबिर संपन्न...

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त भालेवाडी  पशुवैद्यकीय शिबिर संपन्न...

-----------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान  आवताडे‌‌   यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक ८ वा.मौजे भालेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जनावरांचे वंदत्व निवारण व औषधोपचार शिबिर तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिरामध्ये जनावरांना रोग प्रतिबंधक लस व वंध्यत्व निवारण व औषध उपचार करण्यात आले.माजावर न येणारी जनावरे व गाभण न राहणारे जनावरे अशा जनावरांना या शिबिरात औषध उपचार करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांनी मोठ्या सहभाग नोंदवला होता .

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र  बंडगर पशुधन विकास अधिकारी , पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- १ मरवडे. तसेच डॉ. अजित गायकवाड, ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. श्रीकांत दवले, उपसरपंच लिंगेश्वर गवळी, ग्रामसेवक  दत्तात्रय गायकवाड साहेब, ग्रा.प.सदस्य हरिभाऊ गवळी, आबा गवळी मा.उपसरपंच नितीन गवळी मा.ग्रा.प. सदस्य दिलीप शिवशरण, महादेव भोरकडे,विजय बाबर,आप्पा घाडगे, निखिल भोरकडे आप्पा बबन गवळी, महादेव वाघमारे तसेच गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या  सुरुवातीला आ. समाधान  अवताडे यांनी भालेवाडी ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी निधी उपलब्ध करून दिल्याने गावाचा विकास कामात कायापालट होण्यास मदत होणार आहे.  यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार समाधान आवताडे यांच्या  वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिबिर यशस्वी केल्याबद्दल डॉ. रवींद्र बंडगर  यांचे सरपंच डॉ. श्रीकांत दवले व भालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला. आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. रवींद्र बंडगर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बंडगर यांनी भालेवाडी ग्रामपंचायतीस जनावरांचे  शिबिरासाठी एक खोडा उपलब्ध करून दिला. त्याबद्दलही त्यांचे भालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे.