भालेवाडी ग्रामपंचायतचे काम कौतुकास्पद :- निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगीरे
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात दि. 23, 24, 25 हे तीन दिवस मतदार यादी मतदार यादी पून निरीक्षण कार्यक्रम चालू असताना निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगीरे यांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली असता मतदार यादीचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने मयत मतदारांचे नाव कमी करणे, दुबार मतदान नोंदणी, नवीन मतदान नोंदणी करणे, मतदारांचे अस्पष्ट दिसणारे छायाचित्र, 70 वर्षावरील मतदारांची वेगळी मतदार यादी तयार करणे या गोष्टी प्रामुख्याने करण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी मंगळवेढा तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगीरे आले असता त्यांनी भालेवाडी ग्रामपंचायत ने दीड हजार वृक्ष लागवड केलेल्या कामाचे व ग्रामपंचायतीने गावामध्ये केलेला कामाची पाहणी करून ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल सरपंच डॉ. श्रीकांत दवले व त्यांच्या संपूर्ण टीमचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी नायब तहशीलदार हेडगीरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला. गावाचे विकासासाठी महसूल विभागाची गरज भासल्यास वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी सरपंच डॉ. श्रीकांत दवले, उपसरपंच लिंगेश्वर गवळी, ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य, गाव कामगार तलाठी खोमणे भाऊसाहेब, बी. एल .ओ डोके गुरुजी, कोकरे गुरुजी व ग्रामपंचायत कर्मचारी अप्पा घाडगे व निखिल भोरकडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.