आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार फंडातून मारापुर येथे सभा मंडपाचे उद्घाटन संपन्न...

आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार फंडातून मारापुर येथे सभा मंडपाचे उद्घाटन संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (दै. पंढरी नगरी न्युज ) मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार फंडातून मारापुर  सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
         
मान नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गाने बहरलेल्या अशा नयनरम्य सुंदर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नोकरदार युवकांचे आणि कर्तृत्वान व्यावसायिकांचे व प्रयोगशील शेतकऱ्यांची नगरी म्हणून लौकिक असणारे गाव म्हणजे आपले मारापुर गाव होय. मंगळवेढा तालुक्यातील समाजकारण आणि राजकारण या सेवाभावी क्षेत्राची दिशा ठरविण्यात आपला गाव नेहमीच अग्रेसर आणि महत्वपूर्ण भूमिकेत आहे.

अशी विधायक कार्याची परंपरा अधोरेखित करणाऱ्या गावामध्ये काळा मारुती या जागृत देवस्थानाने गावाच्या भक्ती आणि शक्ती आराधन साधनेला वेगळाच आयाम प्रस्थापित करून दिला आहे. सर्व गावकऱ्यांच्या भक्तीचे अढळ स्थान असणाऱ्या सदर मंदिराचे गाभारा नूतनीकरण करणे व सभामंडप उभारणीसाठी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार  समाधानदादा आवताडे यांनी ग्रामस्थांची तळमळ आणि पाठपुरावा यांची दखल घेऊन तब्बल १० लाख रुपये मंजूर केले व आज प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाला. आमदार  यांच्या राजकीय कारकीर्दपासून त्यांच्या सार्वजनिक कार्यामध्ये एकदिलाने ताकद देणाऱ्या तमाम मारापुरकरांची आमदार समाधान आवताडे  यांनी केलेली कदर नक्कीच कौतुकाची नांदी आहे. त्यांच्या या विकास कामाबद्दल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विनायक यादव, विक्रम यादव, हरिभाऊ यादव गवळी, विजयकुमार यादव, गणपत यादव, बाळासाहेब माने, दीपक माने, वासुदेव यादव, रमेश घाडगे, उपसरपंच सौ. सुवर्णा आसबे, युवा उद्योजक राजकुमार यादव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी  आभार मानले.*