*मुंबईच्या छ शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा महोत्सव साजरा होणार:- मुंबई हायकोर्टाची दसरा मेळाव्याला परवानगी.*

*मुंबईच्या छ शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा महोत्सव साजरा होणार:- मुंबई हायकोर्टाची दसरा मेळाव्याला परवानगी.*

---------------------------------------------------------------------------------
*मुंबई,(प्रतिनिधी)**दसरा मेळावा भरवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानावर आपलाच हक्क असल्याचे सांगितले होते. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्जही दाखल केले होते. पण सुरक्षितेच्या कारणामुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती .या अनुषंगाने मूळ उद्धव ठाकरे गटाने आपल्या भागातील असणाऱ्या शिवसेना भवनाच्या समोर पर्यायी व्यवस्था करून दसरा मेळावा घेण्याची तयारी चालू केली होती.

५६ वर्षापासून शिवसेने शिवसैनिकांना राजकीय ऊर्जा देण्यासाठी दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी पार्कवरील मैदानावर दरवर्षी घेण्यात येत होता. परवानगीसाठी मुंबई हायकोर्टाने दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई हायकोर्टाने काल निकाल ठाकरे गटाच्या बाजूच्या दसरा मेळावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी पार्कवर घेणे ही शिवसेनेची परंपरा आहे काही झाले तरी दसरा मेळावा छत्रपती शिवतीर्थावरी मैदानावर होणार असा ठाम निर्णय शिवसैनिकांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन्ही गटातील राजकारण आरोप प्रत्यारोपाने चांगलेच ढवळून निघाले होते परंतु हायकोर्टाने काल दिलेल्या निर्णयामुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांचा दसरा मेळावा होणार यामुळे उत्साहीत झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने आमदार सदारवणकर यांनी दाखल केलेल्या याचिका कोर्टाने फेटाळली असून या गटास नापास झाले मुळे शिंदे गटात सध्या शांततेचे वातावरण पसरले आहे .

या न्यायालयीन निकालानंतर सोलापूर व पंढरपूर येथील शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज येथील चौकात फटाके फोडून व पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा करून घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे . जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव .शहर प्रमुख रवींद्र मुळे .शिवसेनेचे नेते जयंत माने व प्रमुख पोपट सावंतराव तानाजी मोरे सचिन बनपट्टे. शिवाजी साळुंखे .इत्यादी पदाधिकारी व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.