*जागृत परिवार खर्डी यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आयोजन:- सावित्रीच्या लेकीसाठी सायकल वाटप होणार.*

*जागृत परिवार खर्डी यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आयोजन:- सावित्रीच्या लेकीसाठी सायकल वाटप होणार.*

__________________________________________________

*खर्डी (प्रतिनिधी):-*  तालुका पंढरपूर  जागृत परिवार खर्डी यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एक सायकल सावित्रीच्या लेकी साठी या गरीब व गरजू मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अशी माहिती जागृत परिवार खर्डी यांच्या वतीने देण्यात आली.

रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वा. धर्मशाळेसमोर जागृत परिवार खर्डी यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गरीब व गरजू मुलींसाठी आपण दिलेल्या योगदानातून सायकल वाटपाचा उपक्रम या संस्थेच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे.यासाठी जागृत परिवार आपली सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या प्रवाहात गोरगरीब मुलींना प्रवाहात आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम महाराज साखर कारखान्याच्या कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड या उपस्थित असणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन अभिजीत आबा पाटील. व्हाईस चेअरमन प्रेम लता रोंगे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रोंगे पाटील .सिताराम महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर .सूर्यकांत रोंगे बँक ऑफ इंडिया शाखा खर्डी चे संजय पवार .रुक्मिणी विद्यालय पंढरपूर येथील दिनेश आगवणे. सर सिताराम महाराज साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंत पाटील.अँड मोहन रोगे .प्रगतशील शेतकरी लक्ष्मण चव्हाण .इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास खर्डी व पंचकोशी येथील तरुण युवक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे.