व्यापाऱ्यांनी कृषीवसंत निधीचा लाभ घ्या. कृषीवसंत निधी लि,संस्थेचा उदघाटन समारंभ संपन्न..,

व्यापाऱ्यांनी कृषीवसंत निधीचा लाभ घ्या. कृषीवसंत निधी लि,संस्थेचा उदघाटन समारंभ संपन्न..,
व्यापाऱ्यांनी कृषीवसंत निधीचा लाभ घ्या. कृषीवसंत निधी लि,संस्थेचा उदघाटन समारंभ संपन्न..,

पंढरपूर ता. शेतकरी व बेदाणा व्यापारी वर्गासाठी तात्काळ सुलभ कर्ज प्रकरण मंजुर या करीता कृषीवसंत निधी ही संस्था स्थापन केली असून तालुक्यातील गरजु व्यापारी, शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.

 

तालुक्यातील बेदाणा व्यापारी व शेतकरी यांचे विश्वासअहर्तावर आज वसंतकोल्ड स्टोअरेजचे विस्तारीकरण केले असून त्यांना बेदाणा तारण कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे  या करीता कृषीवसंत निधी लि, या संस्था स्थापन केली असून यामध्ये व्यापाऱ्यासाठी कमी व्याजदरात बेदाणा तारण कर्जाची सोय केलेली आहे असे कल्याणराव काळे यांनी सांगीतले.

 

वाखरी ता.पंढरपूर येथे चंद्रभागा डेअरी स्थळावर कृषीवसंत निधी लि, संस्थेचा उदघाटन समारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जेष्ठ संचालिका श्रीमती.मालन काळे यांचे शुभहस्ते करण्यात आला होता. यावेळी प्रतिभादेवी पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव देठे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, कृषीवसंत निधी लि,संस्थेचे चेअरमन विलासराव काळे, महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे गुरुजी, विठठल साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, वसंतदादा मेडीकल फाउंडेशनच्या अध्यक्षा संगिता काळे, जयश्री काळे, मोनिका काळे, शोभाताई पवार, प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार,सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, मा.संचालक तानाजी जाधव, पांडूरंग कौलगे, पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड.राजेश भादुले, शंकर कवडे, पांडुरंग कौलगे, नारायण शिंदे, बाळु शिंदे ,बाळासाहेब पाटील, राजेंद्र माने,कौठळीचे सरपंच अनिल नागटिळक्, डॉक्टर.सुधिर शिनगारे ,डॉक्टर.अजित काळे, चमन ठिगळे, सुरेश कुलकर्णी, दिपक भोसले, पारिजात नवाळे, सोमनाथ आंबरे धनश्री पतसंस्थेचे व्यवस्थापक रविंद्र शिंदे, सुतार साहेब, रणजित कौलगे, सुनिल फराडे , साहित्यिक प्रा.शिवाजी बागल, समाधान सुरवसे ,शरद काळे,  आण्णा डुबल कृषीवसंत निधीचे व्यवस्थापक राघवेंद्र खंडलेवाल  शेतकरी,व्यापारी व कामगार मोठया संख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक वसंत कोल्ड स्टोअरेजचे व्यवस्थापक सुनिल पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषीवसंत निधीचे चेअरमन विलासराव काळे यांनी मानले.