अभिजीत पाटलाच्या हुकुमशाहीमुळे मंगळवेढा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी..? खा.शरद पवार यांचे स्वागतला पंढरपूरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती ; कारण मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांना स्वागत कार्यक्रमास विश्वासात घेतले नसल्याने फिरवली पाठ..?
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते .राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी नंतर शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच दौरा होता. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोला कडे जाताना मंगळवेढा नगरीत शरद पवार यांचे स्वागत श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मंगळवेढा तालुका हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका म्हणून स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांना मानणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जंगी स्वागतासाठी येण्याचे आवाहन केले.
परंतु अभिजीत पाटील यांनी पंढरपूर प्रमाणे मंगळवेढा सर्व तालुक्यातील निष्ठावंत पगार प्रेमी यांना स्वागताच्या तयारीसाठी मंगळवेढा स्थानिक कार्यकर्त्यांनी विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने एक कलमी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला पंढरपुरातीलच कार्यकर्त्यांची उपस्थिती जाणवत होती अशी चर्चा मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून होत होती खा.शरदचंद्रजी पवार यांचे मंगळवेढा येथील श्री संत दामाजी चौक येथे आगमन झाल्यानंतर पवारांच्या स्वागताला मंगळवेढा शहर व तालुक्यातील शरद पवार एकही निष्ठावंत कार्यकर्ता उपस्थित नसल्याने स्वतः अभिजीत पाटील यांनी खासदार पवार यांचे स्वागत केल्याने चर्चेचा विषय होता.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले तसेच नियोजन कार्यक्रमासाठी विश्वासात न घेतल्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.या कार्यक्रमास फक्त अभिजीत पाटील व एक महिला पदाधिकारी, पंढरपूरकर आणि मंगळवेढा ग्रामीण भागातील मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते, स्वागत समारंभाचा कार्यक्रम चालू असताना मंगळवेढा नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक लांबूनच फिरत असल्याचे दिसत होते .खासदार शरद पवार यांच्या स्वागताच्या तयारीसाठी अभिजीत पाटील यांनी मंगळवेढा स्थानिक कार्यकर्त्यांना मुद्दामहून डावल्याचेही चर्चा दिवसभर कार्यकर्त्यांमधून होत होती, त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या विषयी मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा सध्या चौका- चौकात होत आहे .तसेच अभिजीत पाटल यांनी वाजवलेल्या गाजराच्या पुंगीला मंगळवेढा तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते कधीही भूलणार नसल्याचे एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. हा मंगळवेढेकरांना वगळून केल्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले.
त्यामुळे पंढरपूरहून उपस्थित आणलेल्या अभिजीत पाटील प्रेमी कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसल्यासारखे दिसत होते. आजच्या या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमावरून मंगळवेढ्यातील चाणाक्ष जनता कार्यकर्ते विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांना मानणार का ? येणारा काळच ठरवेल अशी ही चर्चा नागरिकांतून होत आहे. सध्या मंगळवेढा शहर व तालुक्यात भाजपाचे आमदार समाधान आवताडे ,विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, विधानपरिषेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक यांचे प्राबल्य असल्याचे जाणकारांमधून चर्चा होत आहे.