पंढरपूर तालुका पोलिसांची आंबे येथील अवैद्य वाळू वाहतूकीवर मोठी कारवाई ◼️ 2 हायवा टिप्पर , 2 टेम्पो एकूण 4 वाहनावर कारवाई करून एकूण 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुका पोलिसांनी आंबे ते रांजणी जाणारे रोडवर अवैध रित्या वाळू वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाल्याने पंढरपूर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वरती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजे आंबे रांजणी जाणारे रोडवर आणि गोपाळपूर येथे रेड करून त्या ठिकाणी 2 हायवा टिप्पर आणि 2 टेम्पो असे एकूण 4 वाहने त्यामध्ये 11 ब्रास अवैधरित्या चोरलेली वाळू असा एकूण 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे एकूण दोन हायवा टिप्पर व 2 टेम्पो असे 11ब्रास वाळू सहन एकूण किंमत 55 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे दोन हायवा टिपर व 2 टेम्पो असे चारही गाड्यांचे चालक आणि मालक 1/ पप्पू शिंदे 2/रामा पुजारी 3/दत्ता भोसले यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस कायदा कलम 303 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेलाआहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे ,पोलीस उपनिरीक्षक रणदिवे, सहाय्यक फौजदार जनार्दन करे ,पोलीस हवालदार दीपक भोसले ,मंगेश रोकडे ,पोलीस हवालदार साळुंखे विजय कुमार, आवटी संजय गुटाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, आसन नदाफ, महेश गोडसे, रामभाऊ चाटे यांच्या पथकाने केली आहे.