लक्ष्मी टाकळीत अवैद्य दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासनाची कारवाई ◼️ सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई "

लक्ष्मी टाकळीत अवैद्य दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासनाची कारवाई  ◼️ सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई "

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावातील हॉटेल शाही दरबारच्या बाजुला एका पत्राशेडच्या बाजुला एक इसम अवैधपणे देशीविदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकासह श्रीराम नगरकडे जाणारे कच्च्या रोडवरील पत्राशेडचे बाजुला एक इसम पांढरे रंगाची पिशवी घेवून थांबलेला दिसला, पोलीस पथकास त्याचा संशय आल्याने त्यास गराडा घालून जागीच पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव शरद बाळासाहेब रणदिवे रा. कांतीवीर लहुजी वस्तादनगर, टाकळी रोड, पंढरपूर असे असल्याचे सांगितले. त्याचे जवळील पिशवी तपासून पाहता त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण १६०३०/- रू. किंमतीचा मुद्देमाल अवैधरित्या विक्री करत असताना मिळून आलेने पोहेकॉ/१७३१ ताजुद्दीन मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस महा. प्रोव्ही. अधि. कलम ६५ (ई) प्रमाणे फिर्याद दिली आहे.

 प्रशांत डगळे , सहाय्यक पोलीस अधीक्षक , पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकादेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायदयानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.

सदरची कारवाई प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक , पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१७३१ मुजावर, पोना/१५२७ गायकवाड, पोकॉ/१४२३ लोंढे, पोकॉ/२११० हुलजंती यांनी पार पाडलेली आहे.