पंढरपूर शहर व तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक पंचिंग मशीन बसवण्याची मागणी

पंढरपूर शहर व तालुक्यातील  शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक पंचिंग मशीन बसवण्याची मागणी

------------------------------------------------------------------------------------

पंढरी- नगरी न्यूज : पंढरपूर  व तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर आपले कामावर येत नसून अशा कामचुकारांना वेळेवर येण्याकरिता सर्व शासकीय कार्यालयांना बायोमेट्रिक पंचिंग मशीनची सुविधा ठेवण्यात यावी अशी मागणी पत्रकार सागर आतकरे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारे केली आहे .पंढरपूर तालुका व शहर हे भौगोलिक दृष्ट्या मोठे क्षेत्र असून संपूर्ण तालुका सधन आहे त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात शासकीय विभागाची कार्यालय मोठ्या प्रमाणात आहेत येथील शासकीय कार्यालयातील कर्मचारी अनेक वेळा वेळेवर उपस्थित राहत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच कामासाठी विनाकारण हेलपाटल मारावी लागतात.

शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९/४५ते सायंकाळी ६/१५ वाजेपर्यंत असूनही अनेक कर्मचारी वेळेचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत बाहेरच टांगळ -मंगळ करून आपला वेळ घालवत असल्याचे दिसत आहे .त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयामध्ये हजेरी पुस्तकावर  सही करून घेतली जाणारी त्यांची हजेरी नोंद बंद करून या सर्व कार्यालयांमध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येण्याकरिता त्यांच्या हजेरी नोंदीसाठी बायोमेट्री पंचिंग मशीन हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत येताना- जाताना या मशीनच्या साह्याने नोंदी ठेवण्यात यावी अशी लेखी तक्रारीद्वारे मागणी पत्रकार सागर संभाजी आतकरे यांनी केली आहे.