महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती शिक्षक मा. आमदार दत्तात्रय सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती शिक्षक मा. आमदार दत्तात्रय सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

-------------------------------------------------------------------
शिक्षक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने स्टेशन रोड वरील संत तनपुरे महाराज मठ परिसर गर्दीने फुल
-----------------------------------------------------------------

पंढरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव तथा पुणे विभागीय शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त स्टेशन रोडवरील संत तनपुरे महाराज मठाजवळील त्यांच्या संपर्क कार्यालयात शहर  तालुक्यातून तसेच पुणे विभाग शिक्षक पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपर्क कार्यालयात तसेच परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते.

यावेळी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मारुती गायकवाड. विजय येवले सातारा. शंकर वडणे उत्तर सोलापूर. शिवानंद तेगीनगिरी राजेश पवार. सतीश चंद्रराव. नितीन कोंडे खंडाळा. महादेव चिकणी वाई तुकाराम दिनके पुणे. ब्रह्मदेव यमगर व सचिन आलेकर कवठेमंकाळ. संतोष नाईक विटा खानापूर. बाळासाहेब क्षिरसागर कोरेगाव. इत्यादी सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक कार्यकर्त्यांनी संधी साधत मोठी गर्दी केली होती. शहर व ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांची जथेच्या जते येत होती. या ठिकाणी हार तुरे व फेट्याचे ढिगारे तयार झाले होते.

मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आंबे येथील आपले  ग्रामदैवत दर्लिंग राया श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली दिवसभरात त्यांना राज्य व जिल्हाभरातील सर्व पक्षीय नेते मंडळी आजी-माजी आमदारांनी शुभेच्छा

दिल्या. यावेळी कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष बापू देशमुख माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या शुक्रवार दिनांक २१ रोजी दिवसभर शिक्षक पदाधिकारी यांची गर्दी पहायला मिळाली राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर दत्तात्रय सावंत यांनी आवाज वारंवार संघटनेच्या माध्यमातून उठवला होता.

यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव. मराठा सेवा संघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष नितीन जाधव. प्रमोद देशमुख. समाधान दुधाट. नंदकुमार टोणपे. नवनाथ मोहोळकर. शिवाजी चव्हाण. शिवाजी शेंडगे. भीमा व्यवहारे. विकास शिंदे. यशवंत विद्यालय पंढरपूर येथील के के जाधव सर.महादेव तळेकर. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे सहाय्यक सचिव यशवंत अंकुशराव. इत्यादी उपस्थित होते.