कै .प्रभाकर खंडागळे(तलाठी) (भाऊसाहेब) यांची दहावी पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी -

कै .प्रभाकर खंडागळे(तलाठी) (भाऊसाहेब) यांची दहावी पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी -

पंढरपूर (प्रतिनिधी) :पंढरपूर  वृंदावन नगर (टाकळी रोडवरील)रहिवाशी असलेले कै प्रभाकर चांगदेव खंडागळे .तलाठी भाऊसाहेब यांची दहावी. पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली असून त्यानिमित्त ,भजन ,किर्तन व पंढरपूर येथील नवरंगे बालक आश्रमातील लहान मुलांना खाऊ वाटत करण्यात आले,कै प्रभाकर खंडागळे भाऊसाहेब हे मुळचे सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी तलाठी म्हणून जवळा,चिकमहूद महिम,गादेगाव ,कोर्टि या ठिकाणी आपल्या कामाची सेवा चांगल्या केली,त्यांना सेवेत असताना महसूल विभागाने वेळोवेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले होते पुण्यतिथी निमित्त दिवसभर भजन ,भारूडचा कार्यक्रम करण्यात आला, शेवटी प्रतिमेस पुषहार घालून फुले वाहण्यात आली सायंकाळी प्रसादाने सांगता करण्यात आली,कार्यक्रमास सांगोला ,पंढरपूर येथील मित्र परीवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते,