यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या वतीने दिवाळी सणासाठी सभासदांना १०% लाभांश वाटपाचा शुभारंभ..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर प्रतिनिधी :- यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था गुरसाळे शाखा पंढरपूर या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सभासदांना दिवाळी सणासाठी १०% लाभांश वाटपाचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ रोजी संस्थेच्या यशवंत सभागृहात संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते लाभांश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रणजीत पाटील, शंकर कवडे, हनुमंत दांडगे, तानाजी मदने, महादेव शिखरे, रमेश पाटील कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे म्हणाले की सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घौडदौड सुरू असून कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यानेच सभासदांना लाभांश वाटप करणे सोयीचे ठरत असून या बँकेची स्थिती चांगली सुधारली आहे .आर्थिक स्थिती चांगली असून यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था सभासदांच्या विश्वासास लाभांश वाटपामुळे पात्र असल्याचे सांगून सभासदांनी आपली ठेवी ठेवून गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक रणजीत पाटील. विलास जगदाळे. विठ्ठलचे माजी संचालक विलास भोसले . मनिषा रणजीत पाटील. तात्यासाहेब निकम .रामचंद्र मोरे. लक्ष्मण मोरे .शुभम कवडे. रमेश घाडगे .समाधान जगदाळे .बाबुराव डबल. उत्तम मोरे .तानाजी मदने रमेश पाटील .रामचंद्र पाटील .अनिल मोरे .शरद मोरे इ .उपस्थित होते .कार्यक्रमास उपस्थित आलेल्या पाहुण्यांचे स्वागत बँकेचे व्यवस्थापक सुनील देसाई यांनी केली .तर आभार संचालक हनुमंत दांडगे यांनी मांडले.