आडम मास्तरांची महापालिका आयुक्त तेली यांच्याबरोबर विविध विषयावर झाली चर्चा

आडम मास्तरांची महापालिका आयुक्त तेली यांच्याबरोबर विविध विषयावर झाली चर्चा

-----------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै. पंढरी नगरी न्युज) : सोमवार ५ डिसेंबर रोजी सांयकाळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी.पाणी , सार्वजनिक नळ बंद मोहीम रोखणे, दिव्यांगाच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली यांच्या समवेत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांची शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली असून त्यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

हयात दाखल्या अभावी नोंदीत दिव्यांग बांधवांना कल्याणकारी निधीतून मिळणारे  लाभापासून जवळपास हजारच्या घरात दिव्यांग वंचित आहेत. तसेच त्यांना मिळणार उदर्निरवाह भत्त्यात वाढ झाली पाहिजे, दिवाळीचे थकीत  सानुग्रह अनुदान  मिळाले पाहिजे या मागण्याबाबत आयुक्त तेली यांनी महत्वाचे निर्णय घेतले.

यु. डी.आय.डी.कार्ड नसेल तर हयात दाखला दाखल केल्यास वंचित दिव्यांगाना लाभ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. १ जानेवारी च्या आत सानुग्रह अनुदान अदा करा, तसेच वाढीव उदरनिर्वाह भत्त्याबाबत अन्य महापालिकाचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल तसेच कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीला साडे चार एम.एल.डी. पाणी देण्यासाठी तपासणी करून  पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक नळ बंद कोणतीही निर्णय घेणार नसून शासनस्तवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिले.

यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, युसूफ शेख(मेजर), म.हनिफ सातखेड, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, बापू साबळे, आप्पाशा चांगले, हसन शेख, अशोक बल्ला अँड.अनिल वासम, मोहन कोक्कुल, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल शेख, इलियास सिद्दीकी, अखिल शेख, आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती.