गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन...

गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन...

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) ; आज शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल वाटप करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले.पालक शिवाजी बागल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . पालक प्रतिनिधी उद्धव बागल, गणेश फाटे, समाधान माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आला.यावेळी सहशिक्षक दीपक देशमुख, वर्षा मोरे, शितल मस्के, शितल बागल, प्राजक्ता मस्के, सोमनाथ भुईटे व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.