शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव चा प्रतीक गोंजारी सिंगापूर येथील नामांकित कंपनीत निवड
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : शिवरत्न जुनिअर कॉलेज गादेगाव चा प्रतीक देवेंद्र गोंजारी याची डिप्लोमा इन न्यूटीसीएल सायन्स या कोर्ससाठी सिंगापूर येथील नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. प्रतीक गोंजारी हा शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधून बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊन एनडीए ची परीक्षा पास होऊन पुढील शिक्षण याक इन्स्टिट्यूट खोपोली च्या मर्चंट नेव्ही विभागामध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर यांनी अभिनंदन केले. प्रतीक हा मुळातच कष्टाळू आणि अभ्यासू वृत्तीचा असल्यामुळे तो या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकला त्याला असणाऱ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले प्रतीकच्या या यशस्वी वाटचालीसाठी शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, नागेश कांबळे ,सोमनाथ भूईटे, दीपक देशमुख, नियाज मुलाणी, वर्षा मोरे ,शितल मस्के, शितल बागल ,अजय मोरे आदी शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवरत्न जुनिअर कॉलेज मधून बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या दिमाखामध्ये पदार्पण करताना दिसत आहे मग ते मेडिकल क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत.