वसंतराव काळे कारखाना निवडणुकीत भाळवणीत काळे गटाच्या वतीने महिलांनी घेतली प्रचारात आघाडी

वसंतराव काळे कारखाना निवडणुकीत भाळवणीत काळे गटाच्या वतीने महिलांनी घेतली प्रचारात आघाडी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमनी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त काळे गटाच्या महिलांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. प्रत्येक सभासदाच्या घरोघरी जाऊन मतपत्रिका देऊन कप बशीच्या चिन्हावर शिक्का मारण्याचे आवाहन जयश्री विलास काळे केले आहे. यावेळी सभासदांना काळे गटाच्या कपबशीच्या चित्रावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचे आवाहन मोनिका समाधान काळे  यांनी केले.

यावेळी स्वाती सुधीर काळे,नम्रता अविनाश काळे,सुनिता अनिल काळे,कल्पना रणजित जाधव आदि उपस्थित होते.