पंढरपुरात आज डॉ. प्रशांत निकम यांच्या ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहरातील नामांकित डॉ. प्रशांत निकम यांच्या नव्यानेच बांधलेल्या ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा इमारतीचा लोकार्पण सोहळा देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती नामांकित डॉक्टर प्रशांत निकम यांनी दिली.
सोमवार दि. 23 /10 /2023 रोजी दुपारी 12:30 वा. नवीन बांधलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते होणार आहे पंढरपूर मध्ये आता भव्य मोठी अद्यावत , अत्याधुनिक अशी सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलची सुसज्य देखणी भव्य इमारत उभारली असून हॉस्पिटलमध्ये अनुभवी कर्मचारी स्टाफ ज्यादा भरती करण्यात आला आहे .कार्यक्रमाचे ठिकाण के, बी, पी कॉलेज चौक पंढरपूर -अकलूज रोड पंढरपूर येथे होणार आहे. तरी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यास शुभआशीर्वाद व प्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.निकम यांनी केले आहे.