सिद्धेवाडी येथील प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांची महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्यपदी निवड ग्रामस्थांमधून निवडीबद्दल शुभेच्छा चा वर्षाव
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांची पुण्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्यपदी निवडून आले बद्दल सिद्धेवाडी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदेतून निवडून द्यावयाच्या दोन सदस्यांसाठी शनिवार रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली असता यामध्ये शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे सदस्य मोठ्या फरकाच्या मताधिक्याने निवडून आले शासनाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ.जगदीश संपकाळ डॉ. वर्षा मैदगी हे निवडून आले .आहेत तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर प्राचार्य डॉ.अरुण जाधव सर हे निवडून आले . त्यात महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर विद्या परिषदेमधून एक सदस्य पाठवायचा होता त्यामध्ये विकास आघाडीकडून प्राचार्य अरुण जाधव व सुटा संघटनेकडून डॉ. रूपाली संपकाळ उमेदवार उभा होते .यामध्ये विकास आघाडीचे प्राचार्य अरुण जाधव हे मोठ्या मताच्या फरकाने निवडून आले त्यांना 27 तर सुटा संघटनेच्या डॉ. रूपाली संपकाळ यांना 15 मते मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला डॉ. अरुण जाधव यांच्या निवडी बद्दल प्रथमता वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानत सचिव अँड. बी .एस पाटील सहसचिव अँड. धैर्यशील पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. तसेच प्राचार्य अरुण जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अकॅडमी कौन्सिलच्या सदस्यपदी निवड करण्यात आली होती त्याबद्दल सिद्धेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता. प्राचार्य अरुण जाधव हे सध्या इस्लामपूर तालुक्यातील वाळवा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी तर माध्यमिक शिक्षण मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज येथे झाले आहे .
त्यांच्या या निवडीबद्दल सिद्धेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच प्रा .लक्ष्मण गोडसे, पुणे विभागकृषी कार्यालयाच्या उपसंचालिका अश्विनी भोपळे, पारनेर तालुका प्रांताधिकारी सुधीर भोसले ,महाराष्ट्र शासनाचा नामांकित कृषी भूषण डाळिंब पुरस्कार मिळालेले दत्तात्रय भोसले ,रयत शिक्षण संस्थेचे मानद सदस्य डॉ. जे. जी जाधव सर ,पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे ,पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, बार्शी येथील शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य डॉ .सुग्रीव गोरे ,पीएसआय विशाल वाघमारे, पीएसआय किरण नवले ,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजाराम जाधव, जवाहरलाल नेहरू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक धोंडीबा गोडसे सर ,सोलापूर जिल्हा महाठोका संघटनेचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव जाधव सर ,तुळजापूर येथील नवोदय विद्यालयाचे प्रा .हरी जाधव सर ,दलित मित्र कदम गुरुजी मंगळवेढा माजी मुख्याध्यापक सी .व्ही जाधव सर ,जवाहरलाल नेहरू हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक पी एम नागटिळक ,श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव ,सोलापूर जिल्हा परिषदेचे स्वच्छता अभियानाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव, पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे ,श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ जाधव, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माजी सैनिक बाबुराव गोडसे ,पंढरपूर तालुका दूध संघाचे संचालक रामचंद्र जाधव ,माजी सरपंच श्रीकांत जाधव ,माजी सरपंच आनंदराव गोडसे , पंढरपूर तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक रमेश जाधव सर ,डॉ. सिद्धेश्वर जाधव, पंढरपूर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव सर, जिल्हा परिषद प्राथमिक वस्ती शाळा जाधव - नागणे वस्ती उत्कृष्ट मुख्याध्यापक एम .बी जाधव, पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, पंढरपूर कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेशक विशाल नागटिळक ,शरदचंद्रजी पवार विचार मंच सामाजिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रदीपक भालेकर गुरुजी ,पंढरपूर येथील यशवंत विद्यालय उत्कृष्ट शिक्षक के .के जाधव सर, इतिहास तज्ञ डॉ. मधुकर जाधव ,डॉ. उत्तम जाधव, डॉ. अंकुश जाधव ,सोमलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव, जय भवानी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन सारंग जाधव, विविध कार्य सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर जाधव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बजरंग जाधव, माजी सरपंच मैनाताई अण्णा जाधव इ. मान्यवर शुभेच्छा देऊन निवडीचे अभिनंदन केले.