गादेगाव शिवरत्न पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न....

गादेगाव शिवरत्न पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज वार्षिक  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न....

---------------------------------------------------------------------------

गादेगाव (दै पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. शिवरत्न जुनिअर कॉलेज गादेगाव सालाबाद प्रमाणे यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .आजच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्याचबरोबर एमबीबीएस साठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी गेले असल्याची माहिती प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटक पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सु .रा .परिचारक नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश (तात्या) पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदितज्ञ विजयकुमार जाधव वकील हे होते त्यांनी शाळेच्या गुणवत्तेविषयी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच वंदनाताई बागल, पद्माकर बागल ,संपादक शिवाजीराव शिंदे ,शशिकांत रामचंद्र बागल , गणेश बागल, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुभाष बागल ,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल बागल . गोरख बागल,  विक्रम  बागल, बिल्डर दत्ता बागल ,ग्रामपंचायत सदस्य पंडित बागल, सिताराम बापू बागल ,हनुमंत बागल ,सर्कल चंद्रकांत ढवळे ,संचालक मोहन बागल ,सहशिक्षक दीपक देशमुख ,नागेश कांबळे ,दस्तगीर शेख नियाज मुलानी ,सोमनाथ भुईटे ,राजेंद्र मुलाणे, शितल मस्के, लीना बागल ,शीतल बागल, प्राजक्ता मस्के ,वर्षा मोरे, अजय मोरे आदी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण यावेळी पहावयास मिळाले. विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी ग्रामस्थांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर  बक्षिसे देण्यात  आली.