नवोदय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व साजरे

नवोदय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व साजरे

____________________________________________________

तुळजापूर (पंढरी नगरी न्यूज ) तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात बुधवार दिनांक ६/९/२०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व उत्साहात साजरे करण्यात आले .सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या धार्मिक सणाचे महत्त्व ओळखून मा. मनोज तानुरकर या विद्यार्थ्यांने श्रीकृष्णा विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांनी हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला का महत्व आहे हे सांगून हा आनंदोत्सव आहे तरी या आनंदामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन करून सर्वांना गोकुळाष्टमी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी जाधव यांनी केले.