छोरिया डेव्हलपमेंट मधिल प्लॉट धारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता..

छोरिया डेव्हलपमेंट मधिल प्लॉट धारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता..

-----------------------------------------------------------------------------------
कंपनी आणि प्लॉट धारकांमध्ये संशयाचे वातावरण*
-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथिल कैकाडी माने यांच्या गट नं ४१७/१, ४१७/२, ४१७/३ या शेतजमिनीचा व्यवहार सन २००७ साली छोरीया प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी झाला होता. त्यानंतर सन २०१३ रोजी जैन यांनी सदर शेत जमिनीचे अंतिम रेखांकन करून ही शेतजमीन बिनशेती करून घेतली होती .

परंतु जैन यांनी हा बिनशेती आदेश महसूल अधिकाऱ्यांची फसवणूक करून घेतल्याची लेखी  तक्रार आपल्या वकिलामार्फत सोलापूर येथिल जिल्हाधिकारी यांच्या कोर्टाकडे केली असून सदरील बिनशेती जमिनीमधून उजनी कालवा विभाग क्रमांक ९ चा ४० मीटर रुंदीचा   कॅनाल असुन जैन यांनी सदरची जमीन बिनशेती करण्यासाठी दिलेल्या मंजुरी रेखांकन अर्जामध्ये हा कॅनाॅल ५ मीटर रुंदीचा दाखवून शासकीय अधिकारी यांची फसवणूक करत बिनशेती आदेश मिळवला व यामध्ये काही प्लॉट पाडून ते प्लॉट विक्री करत असल्याचे दिसून येत आहेत.

तसेच सदर जमिन बिनशेती करण्यासाठी कार्यकारी अभियंता उजणी कालवा विभाग क्रमांक ९ ची हरकत असताना ही बिनशेती आदेश पारित झालाच कसा असेही कैकाडी माने यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे तर या ठिकाणी काही नागरिकांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कैकाडी माने यांनी सदरील शेतजमीन बिनशर्त आदेश रद्दबादल करण्याची मागणी केली असल्याने या ठिकाणी प्लॉट खरेदी केलेल्या काही प्लॉट धारकांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे.