तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी...
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) ; मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून किरण गायकवाड यांनी भूषविले व अध्यक्ष म्हणून आपल्या वाचनालयाचे जेष्ठ वाचक महादराया पाटील हे होते .प्रास्ताविक संतोष वगरे बोलत असताना म्हणाले की आज सर्व धर्म जाती पंथ न माणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पडलेली मंदिरे, बांधण्याचे काम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले म्हणून आज आपण त्यांची जयंती साजरी करतो सुत्रसंचलन सुभाष सुर्यवंशी यांनी केले . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर या सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज आपल्या वाचनालयात या जयंतीत्सोव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली अगदी खरोखरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी काशी विश्वनाथ मंदिर बांधले व त्याचा जीर्णोद्धार सुध्दा सर्वांच्या साक्षीने केला असे सांगितले.
आभार दिलीप पाटील यांनी मांडले वाचक उपस्थित होते. किरण गायकवाड, अर्जुन लवटे, शंकर पाटील, प्रभाकर गायकवाड,तम्मा कानडे, महादराया पाटील, महादेव कोळेकर, आबा गायकवाड आप्पा बिचुकले, शंकर बिचुकले, आप्पा लवटे, मल्हारी म्हारणूर, भैय्या म्हारणूर, सोन्या खांडेकर, मिना लवटे, लता दिवसे, जयश्री बिचुकले, विमलताई बिचुकले आदी मान्यवर उपस्थित होते.