सिद्धेवाडी जि. प्रा. प्राथमिक केंद्र शाळा जाधव-नागणेवस्ती शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जाधव-नागणेवस्ती शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. उदघाटण सिद्धेवाडीच्या सरपंच सौ. रोहिणी सारंग जाधव, तावशीचे सरपंच गणपत यादव, एकलासपूरचे सरपंच बापू ताड, उपसरपंच नितीन ताड, विठ्ठलचे तज्ञ संचालक दशरथ जाधव यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रदीपक भालेकर गुरुजी, माजी सरपंच श्रीकांत जाधव, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप ननवरे, नवनाथ धुरूपे,सारंग जाधव, तालुका कबड्डी असोशियनचे अध्यक्ष नागनाथ क्षीरसागर, जिजामाता पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील गुरुजी,आप्पा मोरे,बिरुदेव देवळे, नितीन पाटील, शिक्षक भारतीचे संजय हेगडे जिल्हाध्यक्ष अरुण नागणे,महादेव अणपट,तुकाराम जाधव,आण्णा माने,दिलीप आसबे, अविनाश कदम, राहुल बनसोडे हे प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या तीन तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण एकतीस विविध ऍटम सादर करण्यात आले. देशभक्तीपर गीते, बालगीते, गवळण, पाळणा, शेतकरीगीते दिंडीनृत्य,आणि लावणी अशा बहारदार गाण्यांच्या ठेक्यावर बालकलाकारांनी उत्तम सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून बक्षिसे देऊन, टाळ्या वाजवून कलाकार विद्यार्थ्यांना दाद दिली. कार्यक्रमास परिसरातील महिलावर्ग, ग्रामस्थ,पालक, नागरिक व तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
मुख्याध्यापक एम. बी.जाधव व तावशीचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे यांनी सूत्रसंचालन केले.धनाजी जाधव गुरुजी, तेजस्विनी कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका पाटील मॅडम आणि मदतनीस मोरे मॅडम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी काम पाहिले.