राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी वृषाली इंगळे यांची निवड... मंगळवेढा तालुक्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती महिला आघाडी (अजित पवार गट )च्या जिल्हा अध्यक्षपदी मंगळवेढा येथील वृषाली पांडुरंग इंगळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार बबनराव शिंदे ,आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील ,पश्चिम महाराष्ट्र विभाग युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनाली गाडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूर जिल्हाअध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, इंद्रासभाई नाईकवडी ,सुरज चव्हाण इ. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर येथील जामगुंडे मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळीही नियुक्तीपत्र देण्यात आले .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या वृषाली इंगळे ह्या मंगळवेढा येथील रहिवासी आहेत. यावेळी वृषाली इंगळे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष बळकट करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजातील निराधार महिला, विधवा ,बेरोजगारगरीब महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पदाचा उपयोग पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पदाधिकारी कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित होते.