मारापुर - आसबेवाडी - शेलेवाडी - आंधळगाव या रस्त्यासाठी नऊ कोटी ४४ लाख निधी मंजूर:- आ. समाधान आवताडे

मारापुर - आसबेवाडी - शेलेवाडी - आंधळगाव या रस्त्यासाठी नऊ कोटी ४४ लाख निधी मंजूर:- आ. समाधान आवताडे

---------------------------------------------------------------------------------
ग्रामीण भागातील रस्त्यासाठी भरीव निधीची  उपलब्ध केल्याबद्दल  आ. समाधान आवताडे यांचे शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.
---------------------------------------------------------------------------------
          
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) : ग्रामीण भागाचा कायापालट होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मारापुर-आसबेवाडी -शेलेवाडी-आंधळगाव या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम योजना टप्पा दोन मधून निधी उपलब्ध करून दिला. गेले कित्येक वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यापासूनचा वनवास संपवला गेल्याचे भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
           
आ.आवताडे हे नेहमी आपल्या भरीव अशा कामामधून लोकांची मने जिंकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा रस्ता होय. या मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत अशा सुविधा पुरवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. लक्ष्मी दहिवडी गटामध्ये असणाऱ्या या भागातील नागरिक या रस्त्यामुळे त्रस्त होते. कारण पावसाळ्यामध्ये रहदारीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत असत. त्याचा विचार करून या भागातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी त्यांनी हा निधी मंजूर केला.
                    
आमदार समाधान आवताडे यांच्या अथक परिश्रमाबरोबर मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या सततच्या पाठपुरावामुळे पिढ्यान पिढ्या रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठी आपल्या भरीव आशा कामगिरीसाठी प्रसिद्ध असणारे विनायक यादव यांनी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले.

या मंजुरी बद्दल ज्येष्ठ नेते सुरेश भाकरे, आंधळगावच्या सरपंच शांताबाई भाकरे, मारापुरचे विद्यमान सरपंच विनायक यादव, उपसरपंच सुवर्णा आसबे, मा. संचालक भुजंगराव आसबे, मा. सरपंच भगवानराव आसबे, युवा उद्योजक राजकुमार यादव व त्याचबरोबर मारापूर ,शेलेवाडी व आंधळगाव परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.