खासदार शरद पवार व संत तनपुरे महाराज यांनी केले अभिजीत पाटील यांचे कौतुक
____________________________________________________
निमित्त साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण व संत तनपुरे बाबा यांच्या ३६व्या पुण्यतिथी सोहळा...
____________________________________________________
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) : देशाचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भागवत धर्माचे प्रसारक संत तनपुरे बाबा यांच्या ३७वा पुण्यतिथी सोहळा व साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सत्याग्रह स्मारक नागरिकांसाठी खुले झाले आहे. अतिशय सूक्ष्म बाबी अत्यंत सुबकतेने यात टिपलेल्या आहेत. ऐतिहासिक व समता, बंधुता या वारकरी विचारधारा असलेल्या साने गुरुजी समता सत्याग्रह स्मारक पंढरपूरकरांसाठी अभिमानाची व या विचारधाराची जोपासना करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे.
यावेळी वै.संत तनपुरे बाबा पुण्यतिथी सोहळा तसेच ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे महाराज यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सप्तनीक यांचा सत्कार करण्यात आला व अन्नदान सेवा कार्याचाही रोप्यमहोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री.बबनराव शिंदे म्हणून उपस्थित तर विठ्ठल कारखाना चेअरमन अभिजीत आबा पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, स्मारक समिती अध्यक्ष राजाभाऊ आवसक, कार्याध्यक्ष अनंत तनपुरे महाराज,सचिव दादासाहेब रोंगें आदी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर , आजी माजी राजकीय नेते मंडळींची व विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच साने गुरुजी सत्याग्रह स्मारक समिती आणि श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट सर्व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
आदरणीय श्री.शरदचंद्र पवार साहेब यांनी साहेबांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा बघून आनंद झाला.