भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दिवाळीपूर्वीच होणार

भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दिवाळीपूर्वीच होणार

-------------------------------------------------------------------------------------

मोहोळ प्रतिनिधी :- टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची पडघम वाजले असून दिवाळीपूर्वीच होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला निवडणूक प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून या कारखान्याची निवडणूक दिवाळीपूर्वीच घेणार असल्याचे  निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी. एल. खंडागळे यांनी सांगितले. १९५०० कारखान्याचे सभासद हक्क बजावणार आहेत.

सध्या कारखान्यावर सत्ताधारी चेअरमन तथा खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांची सत्ता आहे. जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणुका दिवाळीपूर्वीच होणार आहेत त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून शासनाने या निवडणुका दिवाळी पूर्वीच घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडून निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असताना थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा आता बिगूल वाजणार आहे .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अतिवृष्टीमुळे १५ जुलै २०१२ रोजी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० सप्टेंबर पर्यंत थांबवण्यात आला होता. त्यासाठी मदत वाढ नसण्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्वतंत्र परिपत्रक काढून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया टप्प्यावर थांबली होती त्यापासून सुरुवात होणार आहे त्यात विशेषतः टाकळी  सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखानाची निवडणूक प्रक्रिया आता  सुरू होणार असून त्याची प्रक्रिया वेगाने होणार असल्याचे निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दीपावली सणाच्या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत.