पंढरपुरात आज श्री .गुरु पंढरीनाथ महाराज चवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनसेवा सोहळ्याचे आयोजन..

पंढरपुरात आज श्री .गुरु पंढरीनाथ महाराज चवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनसेवा सोहळ्याचे  आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथे प्रसिद्ध कीर्तनकार पंढरीनाथ (महाराज )चवरे श्री. गुरु आंबेकर उर्फ आजरेकर पंढरपूर यांच्या पुण्यतिथी निमित्त एक दिवशीय किर्तनसेवा सोहळ्याचे पंढरपुरात आयोजन करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूरचे प्रसिद्ध कीर्तनकार तथा श्री. गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे मालक भागवत (महाराज) चवरे यांनी दिली.

श्री. गुरु पंढरीनाथ महाराज चवरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार दि. 17 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प.श्री. विष्णु (महाराज) टेंभुकर श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन सेवा होणार आहे .कीर्तनसेवा सोहळा संपल्यानंतर सर्व उपस्थित सेवाधारी यांना भोजन प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री .गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड चवरे गुरुजी यांचा वाडा श्री. क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक सेवक भक्तांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनसेवा सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ह.भ.प. भागवत( महाराज) चवरे यांनी केले आहे.