श्री संत दामाजी साखर कारखाना काटकसरीने चालविला हिच स्व.किसनलाल मर्दा यांना आदरांजली :- चेअरमन शिवानंद पाटील,

श्री संत दामाजी साखर कारखाना काटकसरीने चालविला हिच स्व.किसनलाल मर्दा यांना आदरांजली :- चेअरमन शिवानंद पाटील,

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( दै .पंढरी नगरी न्यूज ) श्री संत दामाजी कारखान्याचे मागील दोन हंगामामध्ये चांगले गाळप करुन विद्यमान चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजी खरात व संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतक-यांची बीले, कामगारांचे पगार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांची बीले वेळेत देवुन कारखाना काटकसरीने चालवून स्व.किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकील यांच्या विचाराने कारखान्याचे कामकाज केले असे प्रतिपादन धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी मर्दा वकिलसाहेब यांचे १६ व्या पुण्यतिथीप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला कारखाना साईटवरील स्व.कि .रा.मर्दा व स्व .रतनचंद शहा शेठजी यांच्या पूर्णाकृती पुतळयास धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी संचालक यादाप्पा माळी, रमेश मर्दा, सुभाष मर्दा, किशोर मर्दा, प्रकाश मर्दा, श्रीकांत मर्दा, अनिल मर्दा यांचे शुभहस्ते पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.

पुण्यतिथीच्या निमीत्ताने ह.भ.प.माधव यादव महाराज मारापुर यांचे गुरुदत्त भजनी मंडळ, भजनसम्राट मस्तान मुल्ला, सुभाष शिवशरण, अरुण शिवशरण यांचा भजनाचा कार्यक्रम व ह.भ.प.तानाजी मदने महाराज पुळुजवाडी, पांडुरंग गवळी महाराज भालेवाडी, ह।भ।प।नंदकुमार तोंडसे महाराज व दादासाहेब मेटकरी महाराज फटेवाडी यांचा भारुडांचा कार्यक्रम झालेनंतर दुपारी १२:०० वाजता पुष्पवृष्टी होवुन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली असलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह दौलत माने, राजु पाटील (मुंढेवाडी), अùड।दत्तात्रय खडतरे, तायाप्पा गरंडे, सुखदेव साळुंखे, नारायण माने सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, कारखाना कर्मचारी उपस्थित होते.